घरक्रीडाअवघ्या सात दिवसांच्या प्रॅक्टीसने हवालदाराने पटकावली दोन सुवर्णपदके

अवघ्या सात दिवसांच्या प्रॅक्टीसने हवालदाराने पटकावली दोन सुवर्णपदके

Subscribe

राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत पोलीस हवालदार बाळू चव्हाण यांनी दोन सुवर्ण पदक पटाकवल्याने पोलीस खात्याची मान उंचावली आहे. विशेष म्हणजे नेमबाजीचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना, अवघ्या सात दिवसात त्यांनी नेमबाजीची प्रॅक्टीस करून सुवर्णपदक पटाकवल्याने त्यांचे सर्वत्रच कौतूक होत आहे.

गुजरातमधील बडोदरा येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत पोलीस हवालदार बाळू चव्हाण यांनी केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरच सुवर्णपदक पटावल्याचं चव्हाण यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. जपानमधील कानसई येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही त्यांचे कौतूक करून नेमबाजीच्या सरावासाठी रायफल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं आहे. बदलापूर येथे राहणारे बाळू चव्हाण हे उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अ‍ॅथेलॅटिक्सचे प्रशिक्षण घेतले आहे. थायलंड, मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या भालाफेक स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं आहे.

गुजरातच्या बडोदरा येथे ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेसाठी १५ गेम्स पार पडल्या. अ‍ॅथेलॅटिक्स, स्विमिंग, बास्केट बॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटींग, कबड्डी आदी खेळांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी साडेपाच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रात दहा गेम्स पार पडल्या होत्या. त्यातील विजयी खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. मात्र राज्यात रायफल नेमबाजी स्पर्धेत एकही खेळाडू सहभागी झाला नव्हता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी विविध खेळाडूंची देशात महाराष्ट्राची सर्वात मोठी ६१५ लोकांची टीम होती. नेमबाजीसाठी स्पर्धक असावा यासाठी महाराष्ट्रातून एकमेव बाळू चव्हाण यांनी तयारी दर्शवून नामांकन पाठविले होते. नेमबाजीचे कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना तसेच आतापर्यंत नेमबाजीची कोणतीही स्पर्धेत सहभाग घेतलेला नसतानाही चव्हाण यांनी १० मीटर पीप साइट एअर रायफल शुटींग आणि सर्विसेस या क्रिडा प्रकारात २ सुवर्ण पदके पटकावली आहे. त्यांचं हे यश कौतूकास्पद ठरलं आहे.

- Advertisement -

अशी मिळाली प्रेरणा

ते म्हणतात, ‘लहानपणी झाडावरील आंबे पाडायचो, दसऱ्यात रायफलींने फुगे फोडायचो त्यामुळे एक आत्मविश्वास होता. पोलीस दलात भरती होताना ट्रेनिंगचा एक भाग म्हणून एकदा रायफल सांभाळली होती. त्यामुळे केवळ आत्मविश्वासाच्या जोरावरच सुवर्णपदक पटावल्याचं चव्हाण यांनी सांगितले.’ अंबरनाथ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शुटींग रेंजमध्ये त्यांनी सात दिवसाची प्रॅक्टिस केली. त्यासाठी कोच जगदीशचंद्र किनलेकर यांचे मोलाचे मार्गदशन मिळाले. रायफलही त्यांनीच उपलब्ध करून दिली. नेमबाजीच्या खेळातील अनेक बारकावे त्यांच्याकडून शिकण्यास मिळाल्याने, त्यामुळेच हे यश मिळवू शकलो असेही त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या यशामुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय येनपुरे यांनी बाळू चव्हाण यांचे विशेष कौतूक केले. नेमबाजीची रायफल ही महागडी असल्याने चव्हाण यांना सरावासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही पोलीस आयुक्तांनी देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -