घरमहाराष्ट्रधक्कादायक! पोलिसानेच केला १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार

धक्कादायक! पोलिसानेच केला १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार

Subscribe

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणी ३ महिन्यांची गर्भवती राहिल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला प्रकार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात कैलास तुकाराम धाडी हा पोलीस हवालदार कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील लोणवाडी येथे त्याचे शेत आहे. या शेतातील कामासाठी आई आणि मामीसह कापूस वेचायला ही १९ वर्षीय तरूणी देखील रोज यायची. ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२० यादरम्यान त्या पोलिसाने वेळोवेळी या तरूणीवर अत्याचार केला. दरम्यान, या प्रकारानंतर पीडित तरुणी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

- Advertisement -
विहिरीवरून पाणी आणायच्या बहाण्याने त्याने केला अत्याचार

शेतात काम करत असताना पीडित तरुणीला विहिरीवरून पाणी आणायच्या बहाण्याने एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन हा पोलीस तिच्यावर सतत अत्याचार करत होता. हा प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेसह तिच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिली होती. आई-वडील गरीब असल्याने पीडितेने बदनामीच्या भीतीपोटी ही बाब कोणालाही सांगितली नाही.

वैद्यकीय तपासणीनतंर बिंग फुटले

लोणवाडी गाव पीडित तरुणीचे माहेर असून २४ मे रोजी चाळीसगाव तालुक्यातील वैतागवाडी येथील तरुणाशी तिचे लग्न झाले. लग्नानंतर तिने २७ मे रोजी तिने आपल्यासोबत घडलेली घटना पती आणि सासूला सांगितली. दोघांनी पीडितेला धीर देऊन २८ मे रोजी चाळीसगावातील एका खासगी रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यानंतर तरूणी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

- Advertisement -

पोलीसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

त्यानंतर पती आणि सासूसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन संशयित आरोपी कैलास धाडी पोलीसाविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यावरून धाडीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेचे जाबजबाब नोंदवले आहेत. दरम्यान संशयित पोलीस अद्याप फरार आहे.


…आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -