घरमहाराष्ट्रआंग्रीया क्रुझ जुगार खेळणाऱ्यांसाठी - निलेश राणे

आंग्रीया क्रुझ जुगार खेळणाऱ्यांसाठी – निलेश राणे

Subscribe

'मुंबई – गोवा मार्गावरील आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्या साठीच आहे असं वाटतं. मध्यमवर्गीय आणि पर्यटनासाठी या क्रूझचा उपयोग शून्य आहे' असे देखील निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई – गोवा आंग्रीया क्रुझ सेवा सुरू होण्यापूर्वीच वादाला सुरूवात झाली आहे. तोच आता राजकारण तापू लागले आहे. या क्रुझ सेवेवरून माजी खासदार निलेश राणे यांनी टीकेचा भडीमार केला आहे. मुंबई- गोवा सुरु करण्यात आलेली आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणात एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. या क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने निलेश राणे यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली. या क्रुझला कोकणात एकही थांबा नाही. त्यामुळे सध्या कोकणातील लोकांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येत आहे.

काय म्हणाले निलेश राणे

‘मुंबई – गोवा मार्गावरील आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे? कोकणामध्ये एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्या साठीच आहे असं वाटतं. मध्यमवर्गीय आणि पर्यटनासाठी या क्रूझचा उपयोग शून्य आहे’ असे देखील निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

क्रुझ विषयी थोडक्यात

आंग्रीया क्रुझवर १०४ खोल्या आहेत. यातून ४०० पर्यटकांच्या लवाजम्यासह या क्रूझचा प्रवास २४ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. यासाठी सहा ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान प्रवास तिकीट आकारण्यात येणार आहे. कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना देखील यामध्ये खोल्यांची विशेष सोय असणार आहे. या खोल्या सर्व सुखसोयींनी सज्ज आहेत. खोल्यांच्या निवडीनुसार प्रवास खर्च आकारला जाईल. शिवाय डेक बार, रेस्ट्रो बार, डिस्को बार, जलतरण तलाव, स्पा, वाचनालय कक्ष अशा सुविधा क्रूझवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -