घरमहाराष्ट्रखोपोलीत रस्त्यावरील खड्यामुळे वाहतुकीचे वांदे

खोपोलीत रस्त्यावरील खड्यामुळे वाहतुकीचे वांदे

Subscribe

अतिवृष्टीमुळे शहरातील गुडलक कॉर्नर ते वासरंग गावापर्यंतच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून, माउंट व्ह्यू सोसायटी, तसेच वासरंग पुलावर याची संख्या अधिक आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.

या खड्ड्यांतून आपटल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षांचीही गाडी याच रस्त्यावरून जात असते. शहरातील इतर भागातही हीच परिस्थिती असून, स्थानिक नगरसेवकांनी गणपती उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिल्याचे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -