घरCORONA UPDATEविनाव्यत्यय वीज पुरवठा केल्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी मानले वीज क्षेत्राचे आभार

विनाव्यत्यय वीज पुरवठा केल्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी मानले वीज क्षेत्राचे आभार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लाईट बंदच्या आवाहनाच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे नागपूर नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लाईट बंदच्या आवाहनाच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपासून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे नागपूर नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ९ मिनिटांच्या या अतिशय कठिण कालावधीत राज्यभरात विनाव्यत्यय वीज पुरवठा सुरू होता. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या यशाचे श्रेय डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि राज्यातील जनता सोबत माध्यम प्रतिनिधींना दिले.

हेही वाचा – Coronavirus : लॉकडाऊन नंतरही सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार?

- Advertisement -

२४ तासापासून ३ हजार मेमावॅटचे नियोजन

दर तीन मिनिटांनी डॉ. राऊत स्वतः विजेच्या आकडेवारीची नोंद घेत होते. सुमारे ३ हजार मेगावॅटचे नियोजन मागील २४ तासापासून ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी केले होते. रात्री ८ वाजून ३९ मिनिटांनी राज्याची विजेची मागणी १३३७७ मेगावॅट इतकी होती. नंतर ८ वाजून ४२ मिनिटांनी (13121MW), ८.५४ वाजता (12857MW), ८.५७ वाजता (12455 MW), ९ वाजता (11315 MW), ९.०३ वाजता (10365 MW), ९.०५ वाजता (10121MW), ९.०७ वाजता (9983 MW), ९.०९ (9880MW), ९.१२ (10741MW) इतकी झाली होती. सुमारे ३२४१ मेगावॅटची घसरण झाली. या दरम्यान फ्रिक्वेन्सी ५०.२३ हर्टज इतकी महत्तम तर ५०.०९ हर्टज इतकी न्यूनतम नोंद करण्यात आली. या कालावधीत तिन्ही वीज कंपन्यांचे सुमारे ४९ हजार कर्मचारी मागील २४ तासांपासून जबाबदारी सांभाळून होते.

हेही वाचा – Coronavirus: ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन रुग्णालयात दाखल

- Advertisement -

वीज उत्पादनात कोयना जलविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी आणि पारस विद्युत केंद्रातून वीज उत्पादन सुरू होते. नऊ मिनिटांच्या कालावधीत काही लोकांनी स्वेच्छेने लाईट बंद केली. विशेष म्हणजे मेन स्विच बंद केले नाही. याबद्दल डॉ. राऊत यांनी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -