घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी

पिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरात चक्क मोटरच्या लाईटवर अंत्यविधी केल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चक्क मोटरच्या लाईटवर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने ही वेळ नातेवाईकांवर आल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार उच्चभ्रु परिसर असलेल्या वाकड येथे घडला असून या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच एकीकडे वीज खंडित झाली तर दुसरीकडे रस्ता खोदल्याने चिखल झाला आहे. अशा परिस्थितीतून वाट काढून अंतविधीसाठी नातेवाईकांना जावे लागल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्याने काळोख

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. मात्र, काही घटनांमुळे शहरात खरी परिस्थिती काय आहे? हे लक्षात आणून दिले आहे. आयटी हब अशी ओळख हिंजवडीसह वाकड परिसराची आहे. तिथे अनेक उच्चशिक्षित तरुण राहतात. परंतु, याच परिसरात स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने चक्क चारचाकी वाहनांच्या लाईटवर अंत्यविधी करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने परिसरात काळोख पसरला होता. त्यामुळे स्मार्ट हा शब्द पिंपरी-चिंचवड शहराला शोभतो का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

- Advertisement -

वाकड येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला असून याचा त्रास अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने अडचणीत आणखीन भर पडत आहे. त्यामुळे अशा प्रकरणाकडे महानगर पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. तेव्हाच खरे स्मार्ट सिटीकडे आपले शहर वाटचाल करेल, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – डोंबिवलीच्या स्मशानभूमीत ‘तो’ २४ तास वावरतोय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -