घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात वीज २२ पैशांनी स्वस्त होणार

महाराष्ट्रात वीज २२ पैशांनी स्वस्त होणार

Subscribe

वीज निर्मिती खर्च कमी करण्यासाठी स्वस्त परंतु चांगल्या प्रतीचा कोळसा वीज निर्मिती केंद्रापासून कमी अंतर असलेल्या कोळसा खाणीतून कोळसा मिळावा यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात आले. परिणामी महानिर्मितीचा अस्थिर आकार कमी होण्यासाठी मदत झाली आहे. वीज निर्मितीचा अस्थिर आकार .३२% पर्यंत कमी करण्यात यश आले आहे.   विशेष प्रयत्न करून कोळश्याचे दर कमी करण्यात यश आल्यामुळे वीज निर्मितीचा दर प्रति युनिट 20 ते 22 पैसे कमी झाल्याचा अंतिम फायदा महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना होण्यास मदत होणार आहे

 
माहे जूलै महिन्यामध्ये  मेरीट ऑर्डर डिस्पॅच (एमओडी) नुसार महानिर्मितीचे २० ते २२ औष्णिक वीज निर्मिती संच कार्यरत राहून ६००० मेगावॉटपेक्षा जास्त वीज निर्मिती करणे शक्य होणार आहेमहानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13186 मे वॅट इतकी असून यापैकी औष्णिक विद्युत क्षमता 9750 मे वॅट , जल विद्युत क्षमता 2580 मे . वॅट वायू विद्युत क्षमता 672 मे. वॅट तसेच सौर विद्युत 184 मे . वॅट  इतकी आहे महानिर्मितीचे २१०, २५०,५००,६६० मेगावॉट क्षमतेचे एकूण 28 औष्णिक वीज निर्मिती संच असून, 28 औष्णिक संच्यापैकी सद्यस्थितीत 5870 मे वॅट क्षमतेचे 15 संच वीज निर्मिती करत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्याची विजेची मागणी कमी असल्याने ३४६० मेगावॉट क्षमतेचे ११ संच बंद आहेत, आवश्यकतेनुसार ११ संच वीज निर्मिती करीता उपलब्ध आहेत. संपूर्ण कोव्हिड काळात जूनअखेर महानिर्मितीचे १० ते १२ संच सातत्याने वीज निर्मिती करत होतेमहाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना कमीत कमी वीज दरामध्ये सातत्यपूर्ण वीज पुरवठा करण्याकरिता महानिर्मितीचे धोरण असून त्यासाठी महानिर्मिती नेहमीच प्रयत्न करत आहेमहानिर्मितीची स्थापित वीज निर्मिती क्षमता पूर्णपणे वापरात येण्यासाठी तसेच मेरिट ऑर्डर डिस्पॅच् (MOD) प्रणालीनुसार जास्तीत जास्त संच कार्यान्वित व्हावेत यासाठी अस्थिर आकार कमी करण्यासाठी कोळश्याचा दर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रभावी इंधन व्यवस्थापनावर भर देण्यात आलामहानिर्मितीला 70% कोळश्याचा पुरवठा हा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मार्फत होतो.

 
महानिर्मितीचा जुलै २०२०चा महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत निर्मिती संच निहाय अस्थिर आकार खापरखेडा संच क्र. 5 करीता 2.0075 रुपये , खापरखेडा संच क्र 1 ते 4 करिता 2.2186 रुपये, चंद्रपूर संच क्र 8 आणि 9 करीता 2.3151 रुपये, चंद्रपूर संच क्र 3 ते 7 करीता 2.4255 रुपये , पारस संच क्र 3 4 करीता 2.6250 रुपये , कोराडी संच क्र 8 ते 10 करीता 2.7655 रुपये  तर भुसावळ संच क्र 4 5 करीता 2.8456 रुपये , परळी संच क्र 8 करीता 2.9833 रुपये, परळी संच क्र 6 7 करीता 3.0096 रुपये , कोराडी संच क्र 6 7 करीता 3.2391 रुपये , भुसावळ संच क्र 3 करीता 3. 4208 रुपये नाशिक संच क्र 3 ते 5 साठी 3. 5919 रुपये असा कमी करण्यात यश आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -