घरमहाराष्ट्रभाजप 'ब्लॅकमेलींगचे सरकार'; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

भाजप ‘ब्लॅकमेलींगचे सरकार’; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका

Subscribe

भाजप सरकार हे धर्माच्या आधारावर असलेली सत्ता नसून ब्लॅकमेलींगवर आधारित असलेली सत्ता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह शिवसेनेलाही त्यांनी ब्लॅकमेल केले आहे, अशी जोरदार टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

भाजप सरकार हे धर्माच्या आधारावर असलेली सत्ता नसून ब्लॅकमेलींगवर आधारित असलेली सत्ता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह शिवसेनेलाही त्यांनी ब्लॅकमेल केले आहे. नोटाबंदी हा काळापैसा देशात आणण्यासाठी नव्हे तर राजकिय पक्ष आणि उद्योजकांना ब्लॅकमेल करण्यासाठी घातलेला घाट होता, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपवर केली.

सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन

भाजप सत्तेवर आल्यापासून फक्त ब्लॅकमेलींगचे राजकारण करत आहे. भाजपकडून सर्वच ठिकाणी ब्लॅकमेलींग करण्यात येत आहे. भाजपच्या ब्लॅकमेलींगच्या राजकारणाला शिवसेनाही बळी पडली आहे. तसेच मोदीने कॉंग्रेसला ऑपरेशन टेबलवर घेतले आहे आणि त्यांना मी १० वी नापास डॉक्टर आहे. त्यामुळे मी कसे ऑपरेशन करेल याचा विचार करा. त्यामुळे या १० वी नापास डॉक्टरकडून कसे ऑपरेशन होईल या भितीने कॉंग्रेस गप्प आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही ब्लॅकमेलींगच्या भितीने फडणवीस सरकारसमोर लोटांगण घातले आहे. तुरुंगात जाण्यापासून स्वत:ची सुटका व्हावी, त्यामुळे त्यांनीही मौन बाळगले आहे. नोटबंदी ही ब्लॅकमेलीगचा प्रकार असून त्यांना अडचणीचे ठरणाऱ्याना ब्लॅकमेल करण्यासाठीच नोटाबंदी केली होती, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला. त्यामुळे या ब्लॅकमेलींग करणाऱ्यांना सत्तेवर उखडून टाका, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा सध्या आरोप होत आहे. पण ही जनताच आम्हाला ए टीम केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीवर आरोप करणारे सुपारीबाज आहेत. त्यांना उत्तर देणे मला योग्य वाटत नसल्याचे म्हणाले आहेत. तसेच ब्रिटिशांनी काम करुन थकलेल्या त्यांच्या कामगारांसाठी बीडीडी चाळी बांधल्या. त्याच धर्तीवर हे सरकार एसआरए योजना राबवत आहे. सरकारला झोपडीधारकांना ५०० स्क्वेअर फुटाचे घर देण्याची इच्छा असती तर त्यांनी ही योजना बिल्डरांऐवजी सरकारी प्राधिकारणामार्फत राबवली असती, असे सांगत त्यांनी कॉंग्रेसवरही जोरदार टीका केली आहे.

शिक्षणाची सोय केल्यास आरक्षणाची गरज नाही

शिक्षण फार मोठी इंडस्ट्री आहे. जूनमध्ये शाळा सुरु झल्यावर अनेक शाळा फी वाढवतील. त्यामुळे पालक आंदोलन करतील. केजी टू पीजी शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. इतकेच नव्हे तर सर्व शाळांमध्ये समान शिक्षण हवे, असे केल्यास शिक्षणातील स्पर्धा कमी होईल. सध्या अनेक घटक आरक्षण मागत आहेत. पण आरक्षण हे त्याचे उत्तर नाही. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय केली तर आरक्षणाचा मुद्दा तीव्र होणार नाही, असे सांगत आंबेडकरांनी शिक्षण आणि आरक्षणाबाबतच्या सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

वाचा – धरणामध्ये लघुशंका करणाऱ्यांचे आम्ही गुलाम नाहीत – प्रकाश आंबेडकर

वाचा – प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धास बेदम मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -