घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर महाआघाडीतून 'वंचित'?

प्रकाश आंबेडकर महाआघाडीतून ‘वंचित’?

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यासंबंधी आता राष्ट्रवादीतून नकारात्मक सूर उमटू लागला आहे.

महाराष्ट्रातील महाआघाडीचे भिजत घोगंडे जवळपास मार्गी लागत आल्याचे चिन्ह दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदिय समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मनसेला १, राजू शेट्टी यांना २ तर सीपीएम पक्षाला १ जागा सोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ४४ जागांवर एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते. उरलेल्या चार जागा मित्र पक्षांना सोडणार असल्याचेही ते म्हणाले. याचा अर्थ महाराष्ट्रातील ४८ जागांची चर्चा पूर्ण झाली असून या चर्चेत कुठेही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख आलेला नाही. त्यामुळे महाआघाडीत प्रकाश आंबेडकर ‘वंचित’ राहणार की काय? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले. काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी देखील त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरिही वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव घोषित करण्याचा धडाका सुरुच ठेवला.

- Advertisement -

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत जयंत पाटील आणि धनंजय मुंडे शरद पवारांसमोर म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांची जास्त वाट बघण्यात अर्थ नाही. प्रकाश आंबेडकर प्रेशर टाकत आहेत. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.”

हे वाचा – प्रकाश आंबेडकरांची वाट पाहाण्यात अर्थ नाही, NCPच्या गोटात चर्चा!

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसकडून आधीच नकारात्मक प्रतिक्रिया उमटलेली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतून देखील नकाराचा सूर यायला लागला आहे. त्यातच आंबेडकर यांनी बुलडाणा, नांदेड, यवतमाळ, माढा, अमरावती, बारामती, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाआघाडीतून त्यांना वंचित करावे लागेल, अशी शक्यता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलून दाखवू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -