घरताज्या घडामोडी'खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत कोरेगाव-भीमाचं महत्त्व कायम'

‘खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत कोरेगाव-भीमाचं महत्त्व कायम’

Subscribe

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला आज अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोहून अधिक अनुयायी येतात. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच अभिवादन करण्याचे अनुयायांना राज्य सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोरेगाव-भीमाला पोहोचले असून त्यांनी शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन केलं आहे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ही स्थापन होत नाही, तोपर्यंत कोरेगाव-भीमाचं महत्त्व कायम राहिलं, असं प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नक्की काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

‘१ जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे, असं मी मानतो. पेशवाईच्या काळात जी काही अस्पृश्यता पाळली जात होती, तिच्या विरोधातील हा लढा होता आणि तो लढा यशस्वी झाला असं दिसतं आहे. तेव्हापासून जी सामाजिक चळवळ सुरू झाली आहे, ती अजूनपर्यंत सुरू आहे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ही स्थापन होत नाही, तोपर्यंत या कार्यक्रमाचं महत्त्व कायम राहिल असं मी मानतो’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

कोरोनाच्या परिस्थितीबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशा रितीने बदलली पाहिजे, याचे नियोजन नाही आहे. जर दोन्ही सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचे नियोजना असते तर कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो असतो. पण एकंदरीत असं दिसतंय की, लोकं सांगतायत काय निर्णय घेतला पाहिजे, पण शासन ठरवतं नाही आहे की काय निर्णय झाले पाहिजे. लोकांच्या सांगण्यावरून हे दोन्ही सरकार आदेश काढत आहेत. तसेच मुंबई आणि पुण्याच्या लोकल अजूनही बंद आहेत, त्यामुळे या दोन्ही सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे. म्हणून कोरोनाच्या परिस्थितीनंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही.’


हेही वाचा – औरंगाबादेचे नाव बदलण्यास आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -