Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राष्ट्रवादीला इभ्रत राखायची असेल तर मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही - प्रकाश...

राष्ट्रवादीला इभ्रत राखायची असेल तर मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही – प्रकाश आंबेडकर

Related Story

- Advertisement -

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झआल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते यावर भाष्य करत आहेत. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला इभ्रत राखायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ज्या नेत्यांनी मुंडे प्रकरणात निवडणूक आयोगाकडे गेले त्यांच्यावर निशाणा साधला. प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकिची आहे, हे फौजदारी न्यायालयाच्या अखत्यारित येतं. लोकं निवडणूक आयोगाकडे का गेली हेच मला कळालेलं नाही. राजकारणी माणूस अज्ञानी आहे अशी अवस्था नाही आहे. तो ज्ञानी आहे. पण त्याला काही साधायचं असेल तर तो अज्ञान दाखवतो. ज्यांनी ज्यांनी अज्ञान दाखवलं त्यांनी सोंगं का केली याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, राजीनामा द्यावा – गिरीश महाजन

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी गिरीश महाजन आलेले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

- Advertisement -