घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धास बेदम मारहाण

प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून वृद्धास बेदम मारहाण

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृद्ध व्यक्तीस बेदम मारहाण केली आहे. फेसबुकवर आक्षेपार्य पोस्ट टाकल्यामुळे कार्यकर्त्यांकडून असह्य झाले आणि त्यांनी वृद्ध व्यक्तीस मारहाण केली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृद्ध व्यक्तीस बूट आणि चप्पलने मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमरावतीच्या दर्यापूर येथे हा प्रकार घडला आहे. फेसबुकवर आक्षेपार्य पोस्ट टाकल्यामुळे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे ती व्यक्ती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आक्षेपार्य विधानाचा राग आल्याने आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी चप्पल आणि बुटाने मारहाण केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

अमरावतीच्या दर्यापुरा येथील एका चहाच्या टपरीवर शनिवारी रात्री ही घटना घडली. भाई रजणीकांत नावाचे समाजवादी आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय धोरणांबाबत एक लेख लिहीला होता. ‘आंबेडक हे संघाचे हस्त आहेत. आंबेडकर राज्यातल्या भाजप विरोधी चळवळींना खतपाणी घालण्याचे काम करत आहेत’, असे त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते. याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी दर्यापूर नगरपालिकेत नगरसेवक संतोष कुले यांनी विचारला. त्यांनी भाई रजनीकांत यांना दर्यापूर येथे बोलावले आणि जाब विचारला. त्यानंतर त्यांनी बूटाने मारहाण करायला सुरुवात केली.

- Advertisement -

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

दरम्यान, या घटनेसंदर्भात एका वृत्तवाहिनीला प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मी कुणालाही मारहाण करण्याचे सांगितलेलं नाही. त्यामुळे ज्याने मारहाण केली आहे त्यांचा मी निषेध करतो. मात्र, पोस्ट लिहिणाऱ्याने काळजी घ्यायला हवी. कारण फक्त मारणारा दिसतो. पोस्ट लिहिणारा दिसत नाही. संविधानाने आक्षेपार्य लिहिण्याचा अधिकार दिलेला नाही. माझी बदनामी केली जात आहे. त्यामुळे माझी बदनामी करणाऱ्याला ठोकून काढायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -