घरमहाराष्ट्रसांगलीत काँग्रेसला फटका; प्रतीक पाटलांनी पक्ष सोडला!

सांगलीत काँग्रेसला फटका; प्रतीक पाटलांनी पक्ष सोडला!

Subscribe

सांगलीतील काँग्रेसचे प्रभावी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी नाराजीतून काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

एकीकडे कराडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत आघाडीची जाहीर प्रचार सभा सुरू असतानाच दुसरीकडे तिथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या काँग्रेसमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि सांगलीतले काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. प्रतीक पाटील हे काँग्रेसचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. विशेष म्हणजे, सांगलीत त्यांचं विशेष प्रस्थ असताना त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणं काँग्रेससाठी मोठा फटका मानला जात आहे.

राजू शेट्टींसाठी सोडलं सांगली

आघाडीच्या वाटाघाटींमध्ये सांगली मतदारसंघ राजू शेट्टींसाठी सोडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाराज होऊन प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. ‘काँग्रेसला आता वसंतदादांची गरज नाह. त्यामुळे काँग्रेसचा आणि माझा संबंध संपला’, अशा शब्दांत प्रतीक पाटील यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसेच, ते पक्ष सोडणार असल्याचंही बोललं जात होतं. अखेर आज त्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

- Advertisement -

प्रतीक पाटील भाजपमध्ये जाणार?

दरम्यान, काँग्रेस सोडल्यानंतर नक्की कोणत्या पक्षात जाणार? याविषयी प्रतीक पाटील यांनी काहीही जाहीर केलेलं नाही. चंद्रकांत पाटलांशी काही दिवसांपूर्वी त्यांच्या झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्याच वाटेवर असण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याविषयी कोणतीही स्पष्ट भूमिका त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -