घरमहाराष्ट्रराज्यातील शिक्षकांचा सरकारला आमरण उपोषणा इशारा

राज्यातील शिक्षकांचा सरकारला आमरण उपोषणा इशारा

Subscribe

सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचे जाहिर केले होते. परंतु, अनुदान जाहिर करुनही अनुदान न मिळाल्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक संघटनांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशार दिला होता.

शिक्षक संघटनांकडून मागील १२ वर्षांपासून अनुदानाच्या मागणीसाठी १५२ वेळा आंदोलने, उपोषण आणि पायी पदयात्रा काढण्यात आल्या. यासाठी लढत असताना १६ शिक्षकांचे बळी गेले, तरी अद्यापही अनुदान पूर्णपणे मिळत नाही. ज्या शाळांना अनेक निकषांतून पात्र ठरवण्यात आले, त्यांनाही अनुदान देण्याचे जाहिर करूनही ते देण्यात आलेले नाही. या विरोधात आता कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिक्षकांनी २० नोव्हेंबर रोजी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून राज्यभरातील शेकडो शिक्षक हे आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. सरकारने आम्हाला मागील ४ वर्षांपासून अनुदानासाठी आश्वासन दिले पण त्यासाठीची योग्य अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई प्रमुख प्रशांत रेडीज यांनी दिली.

हेही वाचा – विनोद तावडेंच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षकांची काळी दिवाळी

- Advertisement -

शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर का नाराज आहेत शिक्षक?

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी विद्यमान शिक्षण मंत्री हे विरोधीपक्षात असताना त्यांनी अनेक आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला धारेवर धरण्याचे काम केले. त्यांना शिक्षक आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची अवस्थाही त्यांना माहीत आहे. मंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी शाळांच्या अनुदानासाठी आणि शिक्षकांसाठी जो निर्णय घेण्याची आवश्यकता हेाती, ती घेतली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये त्यांच्याविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – #MeToo : पुण्यातल्या शिक्षकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लाघ्य कृत्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -