घरCORONA UPDATE६५ कैद्यांना कोरोनातून वाचवणाऱ्या तुरुंग अधीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

६५ कैद्यांना कोरोनातून वाचवणाऱ्या तुरुंग अधीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी

Subscribe

बीड जिल्हा कारागृहातीळ तब्बल ६५ कोरोनाबाधित कैद्यांना वाचवणारे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित कैद्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढणारे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना कोरोनाची लागण होताच रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीड जिल्ह्यातील लोटस रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी आले होते. दुर्दैवाने मात्र संजय कांबळे यांची बुधवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते एक उत्तम साहित्यिकही होते.

- Advertisement -

संजय कांबळे मुंबईत असताना २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या नियंत्रणात होती. मोठी जबाबदारी संजय कांबळे यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली होती. शिवाय अभिनेता संजय दत्त याच्या सेलचे ते प्रमुख राहिले होते. मुंबईनंतर त्यांची बीड येथे जिल्हा कारागृहाचे अधिक्षक म्हणून बदली झाली.

एकाच दिवशी ५० कैदी कोरोना पॉझिटिव्ह

सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी बीड कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कारागृहात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी एखाद्या कोरोना योद्ध्यासारखी हाताळली होती. चांगल्या प्रकारे नियोजन करून संजय कांबळे यांनी सर्वच कैद्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढलले होते. मात्र, जेव्हा संजय कांबळे यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -