घरमहाराष्ट्रआता कैद्यांनाही मारता येणार मांसाहार खाद्यपदार्थांवर ताव

आता कैद्यांनाही मारता येणार मांसाहार खाद्यपदार्थांवर ताव

Subscribe

राज्यभरातील सर्व कारागृहांमधील सर्व कैद्यांना आता मांसाहार खाद्यपदार्थांवर ताव मारता येणार आहे.

राज्यभरातील सर्व कारागृहांमध्ये कैद्यांसाठीची वेट कॅन्टीन सुविधा पुन्हा एकदा सुरु करता येणार आहे. त्यामुळे आता कैद्यांना वडा, भजी या चमचमीत पदार्थांसह मांसाहारावर देखील ताव मारता येणार आहे. विशेष म्हणजे कैद्यांना दरमहिन्याला वैयक्तिक खर्चा करता ३ हजार ५०० रुपये दिले जातात. मात्र, आता त्यात देखील १ हजार रुपयाची वाढ करण्यात आल्याने आता त्यांना दरमहा ४ हजार ५०० रुपये मिळणर आहेत.

राज्यभरातील सर्व कारागृहांमधील वेट कॅन्टीन सुविधा २००८ पासून बंद करण्यात आली होती. ही कॅन्टीन सुविधा आता पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कैद्यांना त्यांचा वैयक्तिक खर्च करण्याकरिता रकमेमध्ये १ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांकरिता यापूर्वी वेट आणि ड्राय अशा दोन कॅन्टीन होत्या. मात्र, त्यावर भ्रष्टाचाराचा आरोप वाढल्याचा आरोप होऊ लागल्यामुळे २००८ मध्ये यातील वेट कॅन्टीन बंद करण्यात आली होती आणि फक्त ड्राय कॅन्टीनची सुविधा देण्यात आली होती.  – सुनील रामानंद; पोलीस अपर महासंचालक

- Advertisement -

मांसाहारी पदार्थ, वडा, भजी तसेच जे पदार्थ उपहारगृहात तयार केले जातात ते आता वेट कॅन्टीनच्या माध्यमातून कैद्यांना मिळणार आहेत. तसेच दरमहाच्या खर्चात १ हजार रुपये वाढ केल्यामुळे आता कैदी आपल्या आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारु शकणार आहेत.


हेही वाचा – आता लवकरच हार्बर लोकल बोरिवलीपर्यंत धावणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -