घरमहाराष्ट्रजेव्हा जेलमधील कैदी खेळाडू बनतात!

जेव्हा जेलमधील कैदी खेळाडू बनतात!

Subscribe

आर्थर रोड जेलमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व जेल कैद्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जेल प्रशासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धांचा आनंद लूटला.

जेलमधील कैदी खेळाडू बनू शकतात, अशी कल्पना तुम्ही कधी केली नसेल. परंतु, आर्थर रोड जेलमधील कैदी खरच खेळाडू बनून फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ खेळले. निमित्त होते जेल प्रशासनाने आयोजित केलेल्या खेळांच्या स्पर्धांचे. यामध्ये सर्व जेलकैद्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जेल प्रशासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धांचा आनंद लूटला. काही कैदी यामध्ये खेळत होते, तर काही खेळणाऱ्यांना प्रोत्साहित करत होते तर काही नुसतीच गंमत बघून आनंद लूटत होते. ही स्पर्धा जेल परिसरात रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे संपूर्ण जेल परिसर हर्षमय झाला होता.

हेही वाचा – मुंबईतील जेलमधील कैद्यांसाठी एआरटी सेंटर

- Advertisement -

म्हणून कैदींसाठी आयोजित केली स्पर्धा

जेलमध्ये राहणाऱ्या कैदींना विरंगुळा मिळावा, त्यांनाही मनमोकळे वाटावे आणि कामात त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी आर्थर रोड जेल प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कैद्यांनी सक्रीय सहभाग घेतला. जेल प्रशसनाकडून फुटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कैदी सर्रासपणे एकमेकांना भिडले. मस्तपैकी खेळले आणि जिंकले देखील. जिंकणाऱ्यांना जेल प्रशासनाकडून जिंकणाऱ्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – जेल परिसरात पेट्रोल पंप उभारून कैद्याना रोजगार

- Advertisement -

नायजेरीयन कैद्याने केली कॉमेंट्री

या स्पर्धेत नायजेरियन कैद्यांनीही मोठ्या उत्साह आणि आनंदाने सहभाग घेतला. त्याचबरोबर ते या स्पर्धांमध्ये जिंकले देखील. एका नायजेरियन कैद्याने आंतरराष्ट्रीय पातळीसारखी कॉमेंट्री केली आणि सर्व जेलकैद्यांचे मनोरंजन केले. भारतीय कैद्यांनी व्हॉलीबॉलमध्ये मजल मारली. त्याचबरोबर कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेमध्येदेखील भारतीय कैद्यांनी चांगला खेळ खेळला. याविषयी बोलताना अर्थर रोड जेलचे अधीक्षक म्हणाले की, रोजच्या त्याच त्याच दिनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा, कैद्यांनी चांगले काम करण्यासाठी प्रफुल्लित व्हावे, यासाठी जेल प्रशासनाकडून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्या कैद्यांचा जाहिर सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन दिले गेल्याचे देखील अहिरराव यांनी सांगितले.


हेही वाचा – जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -