घरमहाराष्ट्रप्रिती बारिया हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा

प्रिती बारिया हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा

Subscribe

भंडाऱ्यातील प्रिती बारिया हत्याकांड प्रकरणातील आरोपींना अखेर कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या तीन वर्षापासून आरोपींविरोधात सुनावणी सुरु होती. आज अंतिम सुनावणी झाली यामध्ये कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

भंडाऱ्याच्या बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणातील आमीर शेख आणि सचिन राऊत या दोषी आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपींनी भंडाऱ्यामध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन मुलांना कायम अपंगत्व आले आहे. अखेर ३ वर्षानंतर भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अशी घडली होती घटना

३० जुलै २०१५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने आमीर शेख आणि सचिन राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करून घरातील सोन्याचे दागिणे, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरून नेले होते. तेव्हापासून अश्विनी शिंदेला अपंगत्व आले आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी या आरोपींनी तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया हिच्या डोक्यावर हातोडीने वार करून तिची हत्या केली. त्यावेळी तिचा मुलगा समोर आला असता त्याच्याही डोक्यावर आरोपींनी हातोडीने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. बारीया यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने आणि ३ लाख रूपयांची रोख रक्कम चोरून नेले होते.

- Advertisement -

अखेर आरोपींना फाशीची शिक्षा

दोन्ही आरोपींनी रविंद्र शिंदे यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरले होते. या एटीएम कार्डचा वापर करून ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी लोकेशन शोधून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन्ही घरात चोरी केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ओरपींकडून चोरी केलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून आरोपींविरोधात सुनावणी सुरु होती. आज अंतिम सुनावणी झाली यामध्ये कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -