Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरेगाव-भीमा विकास आराखड्यासाठी खासगी जागा ताब्यात घेणार - अजित पवार

कोरेगाव-भीमा विकास आराखड्यासाठी खासगी जागा ताब्यात घेणार – अजित पवार

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केलं. यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना कोरेगाव-भीमा विकास आराखड्यासाठी खासगी जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. कोरेगाव भीमाचा विकास आराखडा मंजूर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, अर्जामंत्री नितीन राऊत आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केलं.

सैनिकांनी त्यावेळे जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव-भीमा ठिकाणचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्तंभाजवळच्या स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. खासगी मालकीच्या जागा ताब्यात घेऊन त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी पालकमंत्री आहे शिवाय मी अर्थमंत्री देखील आहे. त्यामुळे या विकास आराखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, याची ग्वाही देतो, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवे वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो हीच सदिच्छा. गेल्या एक वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटातून मार्ग काढत आहे. कोरोनाच्या काळात जे नऊ महिने वाया गेले ते भरुन काढायचे हाच नव्या वर्षाचा संकल्प आहे, असं अजित पवार म्हणाले,

 

- Advertisement -