लक्झरी वाहनांचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले

नियमांप्रमाणे खाजगी लक्झरी वाहन चालकांना एसटी महामंडळाच्या बस तिकिटांच्या तुलनेने दीडपट रक्कम घेण्याचा अधिकार आहे. परंतु, आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढती गर्दी बघून खासगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत.

Mumbai
private luxury buses increases ticket rate double and triple than ST bus
लक्झरी वाहनांचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले

दिवाळीला सुट्टीनिमित्ताने गावाकडे फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असल्यामुळे आता खाजगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाच्या दरात दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. या भाडेवाढमागील कारण लक्झरी वाहन चालकांना विचारले असताना, त्यांनी एसटी महामंडळाच्या भाडेवाढ केल्याचा दाखला दिला. नियमांप्रमाणे खाजगी लक्झरी वाहन चालकांना एसटी महामंडळाच्या बस तिकिटांच्या तुलनेने दीडपट रक्कम घेण्याचा अधिकार आहे. परंतु, आता दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढती गर्दी बघून खासगी लक्झरी वाहन चालकांनी तिकिटाचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहे.

हेही वाचा- उद्यापासून एसटीची तिकिटे १० टक्क्यांनी महागणाार!

काय आहे सध्याच्या तिकिटांचे दर

मुंबई ते कोल्हापूर मार्गावरील वातानुकूलित एसटीचे सध्याचे भाडे प्रतितिकीट ७६५ रुपये आहे. तर खासगी लक्झरीचे तिकीट दर ८५० ते १५०० एवढे आहे. मुंबई ते सातारा मार्गावरील वातानुकूलित एसटीचे तिकीट दर ५२२ रुपये आहे तर खासगी गाड्यांचे तिकीट दर ६०० ते १३०० रुपये आहे. मुंबई ते चिपळून वातानुकुलित एसटीचे दर ५०० रुपये आहे तर खासगी लक्झरी चालक यासाठी ५०० ते १५०० रुपयांपर्यत पैसे मागतात. मुंबई ते औरंगाबाद वातानुकूलित एसटीच्या तिकिटाचे दर ६२१ रुपये आहे तर खासगी लक्झरीचे तिकीट दर ६५० ते १३५० एवढे आहे.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांचे आज आझाद मैदानावर उपोषण

दरवाढी मागील खासगी वाहन चालकांचे कारण

इंधन दरवाढीचे कारण देत, एसटी महामंडळाने दिवाळी सणासुधीच्या काळात १० टक्के भाडेवाढ केली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत खासगी लक्झरी वाहन चालकांनी एसटीच्या नवीन दरांच्या दुप्पट-तिप्पट भाडेवाड केली. त्यांना यामागील कारण विचारले असता, महामंडळाला इंधन सवलतीच्या दरात मिळते. आम्हाला बाजारभावाच्या दरात इंधन मिळते. शिवाय, रस्त्यांवर खड्डे असल्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसात होत असल्याचे कारण लक्झरी चालकांकडून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – एसटी महामंडळाविरोधात दिव्यांगामध्ये रोष

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here