घरमहाराष्ट्रसागाची चोरटी वाहतूक रोखली

सागाची चोरटी वाहतूक रोखली

Subscribe

शहापूर वन विभागाची धडक कारवाई

सागाच्या नगांची चोरटी वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना पकडून त्यांच्याजवळील असलेला मुद्देमाल वाहने जप्त करण्यात आली. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचला होता. शहापूर तालुक्यातील वन परिमंडळ दहागाव- नेवाडा हद्दीतील बरफपाडा गावाजवळ चोरट्या तोडीचे साग चौपट नगांची वाहतूक करताना वन अधिकार्‍यांनी दोघांना पकडले. या कारवाईत अंदाजे एक लाख दहा हजार किंमतीचे 40 साग ताब्यात घेण्यात आले. तसेच एक पिकअप टेम्पो आणि एक मोटारसायकल जप्त केली.

संतोष पादीर व रविंद्र वाघे या दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 23 ऑगस्ट 2019 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. या कारवाई मध्ये शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने, तसेच वनपाल के. सी. मोहरघे, डी. व्ही. शेलार, सुनील भोंडीवले, वनरक्षक एस.एच.निकम , सचिन तळपाडे, आर.व्ही. यांनी सहभाग घेतला होता .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -