घरमहाराष्ट्रपाण्याच्या मागणीसाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखला

पाण्याच्या मागणीसाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखला

Subscribe

पिंपरी-चिंचवड च्या कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने पुणे-मुंबई जुना महामार्ग नगरसेवकासह स्थानिक नागरिकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रोखून धरला होता.

पिंपरी-चिंचवड च्या कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने आज, बुधवारी दुपारी पुणे-मुंबई जुना महामार्ग नगरसेवकासह स्थानिक नागरिकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रोखून धरला होता. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाणीपुरवठा अधिकाऱ्याने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला.

सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येते

कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी या प्रभागात गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येथील नागरिक पाण्यावाचून हैराण झाले आहेत. याच कारणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज दुपारी दापोडी पोलीस चौकीसमोर जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आणि रस्त्यावर ठिय्या मांडला.यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच येऊन आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला घेतले.

- Advertisement -

हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

महानगर पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी रामदास तांबे यांनी दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. तसेच वेळीच पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर, महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन हंडा मोर्चा काढण्यात येईल आणि आयुक्तांना काळे फासले जाईल, असा इशारा नगरसेवक राजू बनसोडे यांनी दिला आहे. यावेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सहा सात महिण्यापूर्वी अश्याच प्रकारे महामार्ग रोखून पाणी प्रश्न मांडण्याची वेळ येथील नागरिकांवर आली होती. तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात प्रश्न मिटला. मात्र पुन्हा कमी दाबाने पाणी येत असल्याने आज आंदोलन केले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, माई काटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -