घरमहाराष्ट्रपब्जी खेळाच्या नादात दोन मित्रांनी गमावला जीव

पब्जी खेळाच्या नादात दोन मित्रांनी गमावला जीव

Subscribe

पब्जी खेळाच्या नादात हिंगोली येथे रेल्वे खाली चिरडले जाऊन दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पब्जी खेळामुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये दिवसें दिवस वाढ होत चालली आहे. हिंगोलीमध्ये पब्जी खेळ खेळण्यासाठी रेल्वे पटरीवर बसलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास हे दोघेही मित्र पब्जी मोबाईल गेम खेळण्यासाठी हिंगोलीच्या खटकाळी बायपास भागातील रेल्वे पटरीवर बसले होते. यावेळी पब्जी गेम खेळण्यात हे दोन्ही मित्र इतके मग्न होत की ट्रेन आल्याच त्यांना भानच राहीले नाही. त्या दोघांनीही कानात हेड फोन घातले असल्याच घटनास्थळी दिसून आले आहे. या घटनेमध्ये नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कुटुंबीयांवर शोककळा

रेल्वे पटरीवर बसून पब्जी मोबाईल गेम खेळणाऱ्या या दोन्ही मित्रांचा अकोल्याहून पूर्णाकडे जाणाऱ्या ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, या दोघांचेही मृत देह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालात पाठवण्यात आले. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्या नंतर त्यांच्यावर दुखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

आणखी किती बळी घेणार पब्जी ?

या घटनेमुळे पब्जी मोबाईल गेमचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशभरातील तरुणांना पब्जी या मोबाईल गेमने वेड लावले आहे. या पूर्वीही पब्जी गेम खेळणाऱ्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या, हल्ले केल्याच्या, वाद विवादाच्या, अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच कुर्ल्यामध्ये दोन सख्या भावांनी पब्जी गेम वरुन झालेल्या वादातून दोघांना चाकूने भोसकल्याची घटना समोर आली होती. या खेळामुळे हिंसक भावना वाढीला लागत असून नागेश आणि स्वप्निल सारखे अनेक तरुण पब्जी या खेळाने बळी पडत आहेत. या आधी एका लाहानग्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पबजी खेळाच्या बंदी साठी पत्र लिहिले होते. तर गुजरात राज्यात पब्जीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पब्जीवर सरकार काही निर्बंध लावणार का ? की आणखी काही बळींची वाटपाहणार हे पाहणे महत्वाचे आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -