घरमहाराष्ट्रशिर्डी साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

शिर्डी साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

Subscribe

यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे देखील सांगितले जात आहे. यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक प्रकृती खालवल्याने त्यांच्या वर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के व्ही रमणी यांनी संस्थानला ११० कोटीच्या देणगीतून साईआश्रम इमारत बांधून दिली, त्यातील काही इमारतीत आज कोविड हॉस्पिटल सुरू आहे. तसेच मोहन यादव हे नेहमी कोणाच्याही मदतीस धावून जाणारे होते. त्यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा जवळपास बारा भाषेत अनुवाद झालेला आहे. यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.


संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवरून केले हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -