घरमहाराष्ट्रपुलंच्या जयंतीनिमित्त 'पुलोत्सवा'ला प्रारंभ

पुलंच्या जयंतीनिमित्त ‘पुलोत्सवा’ला प्रारंभ

Subscribe

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला गुरुवार, ८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. पुण्यातील पुलंच्या 'मालती माधव' या निवासस्थानी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ झाला तर मुंबईतही विलेपार्ल्यात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला गुरुवार, ८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला होता. ते लेखक, नाटककार, हास्यकार, अभिनेता, कथाकार तसेच पटकथाकार, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार होते. त्यांनी त्यांच्या मोहक आयुष्यात अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘उरलंसुरलं’, ‘एक होता विदुषक’, ‘गुळाचा गणपती’, ‘बटाट्याची चाळ’ या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती आहेत. यंदाचे वर्ष पुल यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जयंतीच्या दिवशी पुलोत्सावाचे उद्घाटन करण्यात आले.

‘ग्लोबल पुलोत्सव’चे उद्घाटन

दरवर्षी, साजरा होणारा ‘पुलोत्सव’ हा आत्ता जागतिक पातळीवर साजरा झाला आहे. भारतातील सुमारे वीस आणि भारताबाहेरील ५ खंडांमधील सुमारे ३० शहरांत पुलोत्सव आयोजित केला गेला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आशय सांस्कृतिक, पुण्यभूषण प्रतिष्ठान आणि पु. ल. परिवाराच्यावतीने आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सव’चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते काल पुण्यात झाले. पुलोत्सवाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. यंदाच्या पुलोत्सवात पुण्यभूषण प्रतिष्ठान, पु. ल. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्था सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, तसेच मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, मयूर वैद्य आणि नायनीश देशपांडे उपस्थित होते.

- Advertisement -

मनुष्याच्या आयुष्यात विनोद नसेल तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. पुलं हा ‘खेळीया’ नव्हता तर माणसं जमवणारा ‘मेळीया’ होता. पुलंनी हसविण्याबरोबरच लोकांना रडविले, विचार आणि अंतर्मुख करायला लावले. पुलंच्या विनोदाने सामान्य माणसांशी हस्तांदोलन केले. विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी शस्त्र म्हणून वापर केला.
– मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

पुलंच्या निवासस्थानी जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ

चौदा वर्षांच्या पुलोत्सवावर ‘मागोवा’ या साकारल्या जात असलेल्या लघुपट निर्मितीचा शुभारंभ डॉ. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला. “पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला समृद्ध केले. पुलंनी रसिकांना अभिरुची संपन्नता दिली”, असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली. त्या म्हणाल्या, “पुलंच्या ‘मालती माधव’ या निवासस्थानी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ असा नीलफलक लावण्यात आला. चित्रपट, साहित्य, संगीत यापैकी एका क्षेत्रासाठी पुलं देशपांडे पुरस्कार दिला जाणार आहे. ही एक सांस्कृतिक चळवळ आहे ती पुढे नेणे आपली जबाबदारी असल्यामुळे पुलोत्सवाला महापालिकेतर्फे ३ लाख रुपये दिले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल.”

- Advertisement -


दरम्यान, मुंबईतही पुलोत्सवाला सुरुवात झाली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरु झाल्याचे जाहीर केले. यासंबंधीचे ट्विट त्यांनी केले आहे. काय म्हणाले तावडे ट्विटरवर-

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरूवात ही एका अर्थाने शब्दस्वरांची दिवाळी! त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रातील अगणित रसिकांच्या वतीने पुलंना विनम्र अभिवादन! पुलं जन्मशताब्दी वर्षानिमित्त चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज, (८ नोव्हेंबर) विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघात केले. यात पुलंचे प्रेरणादायी जीवन चित्र-शिल्प, चित्रफितीतून मांडले आहे. हा ठेवा तरूणांपर्यंत पोहचवून त्यांच्यातून दर्जेदार कलावंत, रसिक निर्माण होवोत, हे आमचे उद्दिष्ट आहे!
– विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -