घरमहाराष्ट्रPulwama attack : 'राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर द्या'

Pulwama attack : ‘राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर द्या’

Subscribe

राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर द्या, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दुपारी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निषेध नोंदवला आहे. राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे निषेध नोंदवला आहे. ‘पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. या शहिद कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे’, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंनी सर्व मतभेद विसरुन दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याचं आवाहन केलं आहे.

पुलवामामधील भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला हा इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरुन जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांच्या बसमध्ये तीन बटालियनमध्ये जवळपास २५०० हजार सैन्य होते. ही जवानांची बस येतातच त्या कारने जोरदार धडक देत हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले असून २० जवान जखमी झाले आहेत. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

वाचा – Pulwama attack: पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

वाचा – भारत-बांगलादेश सीमेवर महाराष्ट्राची वाघीण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -