घरमहाराष्ट्रPulwama attack : छप्पन इंचाची छाती असफल - शरद पवार

Pulwama attack : छप्पन इंचाची छाती असफल – शरद पवार

Subscribe

'पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सुरक्षा करारानंतरही हल्ले केले जात आहेत. त्यामुळे छप्पन इंचाची छाती ही असफल ठरली' असल्याचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लगावला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४४ जवान शहीद झाले असून ४० हून अधिक जवान जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्लाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपावर टीका होत आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला वेठीस धरत मोदींवर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या सुरक्षा करारानंतरही हल्ले केले जात असून छप्पन इंचाची छाती कधी उत्तर देणार’? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय म्हणाले शरद पवार

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, शरद पवार असे म्हणाले आहेत की, ज्यावेळी पुलवामा जिल्ह्यात जो भ्याड हल्ला झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, ‘जे जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण देश आहे’. यावर शरद पवारांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे की, ‘ही वेळ राजकारण करण्याची नसून तुमची छप्पन इंचाची छाती असफल ठरली आहे’. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, ‘ज्या रस्त्यावर हा भ्याड हल्ला झाला आहे. तो रस्ता सुरक्षित असताना देखील त्याठिकाणी हल्ला कसा होतो? असा सवाल शरद पवारांनी मोदींना केला आहे. तसेच या मार्गावरुन CRPF चे जवान जाणार असल्याची पूर्वकल्पना दहशतवाद्यांना या अधीच होती त्यामुळे हा चिंतेचा विषय असल्याचे देखील पवार पुढे म्हणाले आहेत.

- Advertisement -

पुलवामामधील भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला हा इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरुन जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांच्या बसमध्ये तीन बटालियनमध्ये जवळपास २५०० हजार सैन्य होते. ही जवानांची बस येतातच त्या कारने जोरदार धडक देत हल्ला चढवला. या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले असून २० जवान जखमी झाले आहेत. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरु आहेत.


वाचा – Pulwama हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्स म्हणतात…

- Advertisement -

वाचा – दहशतवाद्यांसमोर देश झुकणार नाही – राहुल गांधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -