घरमहाराष्ट्रपुनाडे धरण सुरक्षित,जलसंपदाचा निर्वाळा

पुनाडे धरण सुरक्षित,जलसंपदाचा निर्वाळा

Subscribe

कोकणातील तिवरे धरण फुटून अनेक निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील सर्व धरणांची तपासणी सूरू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे उरण येथील पुनाडे धरणाची नुकतीच जलसंपदा विभागाचे अभियंता अजय कदम यांनी पाहणी केली. त्यानंतर हे धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. हे धरण बांधल्यापासून त्याला गळती लागली आहे. अनेक उपाय योजना करून ही गळती थांबलेली नाही.

या बाबत जलसंपदा विभागाचे अभियंता अजय कदम यांच्याकडे विचारणा केली असता तिवरे धरण दुर्घटनेनंतर आम्ही ग्रामस्थांसोबत या धरणाची पाहणी केली. धरणाच्या बंधार्‍यातून कुठेही गळती नसून आऊटलेटमधून पाण्याची गळती होत आहे. मात्र त्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. ही गळती रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -