घरCORONA UPDATEGood news : भारतालाही करोना टेस्टिंग किट निर्मितीत यश, पुण्यात दिवसाला १...

Good news : भारतालाही करोना टेस्टिंग किट निर्मितीत यश, पुण्यात दिवसाला १ लाख किट्सची निर्मिती

Subscribe

पुणेस्थित एका कंपनीने करोना व्हायरसची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठीचा वाणिज्यिक मंजुरी मिळवली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन एण्ड ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) मार्फत या किट्सच्या निर्मितीसाठी कंपनीने यशस्वीरीत्या परवानगी मिळवली आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे सध्या करोनाचे १ लाख टेस्ट किट्स आहेत. तर पुण्यात परवाना मिळवलेली कंपनी आता १ लाख किट्सची निर्मिती एकाच दिवसात करू शकणार आहे. याआधी आयसीएमआरने जर्मनीकडून २ लाख टेस्टिंग किट्स मागविले आहेत.

पुण्यातल्या मायलॅब्सने पॅथोडिटेक्ट कोव्हिड-१९ क्वालिटेटीव्ह पीसीआर किट अवघ्या सहा आठवड्याच्या कालावधीत तयार केले आहे. हे किट्स सामान्य किट्सपेक्षा अधिक वेगवान आहेत. मायलॅब्सच्या किट्सच्या माध्यमातून करोनाग्रस्ताची चाचणी अवघ्या अडीच तासांच्या कालावधीत शक्य होणार आहे. आधीच्या ७ तासांच्या कालावधीपेक्षा आता ७ तासांमध्येच ही चाचणी करणे शक्य होईल. महत्वाच म्हणजे भारतीय बनावटीचे हे पहिले टेस्टिंग किट आहे. राज्यातील सरकार तसेच केंद्रातील सरकार यांच्या मदतीनेच तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकानुसार हे किट तयार करण्यात आले आहे. या किटची निर्मिती आणि चाचणी ही अतिशय जलदगतीने करण्यात आली आहे असे मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या केंद्र सरकार मोजत असलेल्या किट्च्या तुलनेत या लॅबमार्फतच्या किटच्या माध्यमातून अवघ्या १२०० रूपये प्रति किट या दराने पैसे आकारले जातील. ऑटोमॅटेड पीसीआर टेस्ट किटच्या माध्यमातून सध्या १ हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास केला जातो. पण मायलॅब किटच्या माध्यमातून अवघ्या १०० रूग्णांचा अभ्यास शक्य आहे.

भारतात सध्या खूप कमी लोकांची चाचणी करोना व्हायरससाठी होत आहे. सुमारे १० लाख लोकांमागे अवघ्या १५ जणांची चाचणी भारतात होत आहे. जगभरात लोकांच्या होणाऱ्या चाचण्यांमध्ये या चाचण्या सर्वात कमी अशा भारतात होत आहेत. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून आतापर्यंत परदेशी प्रवास करणाऱ्यांचीच चाचणी केली जात होती. तसेच ज्या लोकांना करोनासदृश्य लक्षणे होती अशा लोकांची चाचणी होत होती. आयसीएमआरने १२ खाजगी लॅब्सनाही यासाठीची परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -