घरताज्या घडामोडीपुण्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ९६ हजार वर

पुण्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ९६ हजार वर

Subscribe

पुण्यात आज दिवसभरात नव्याने ७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात नव्याने ७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६६ हजार ६२७ इतकी झाली आहे. तर आजवर एकूण १ हजार ५७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

५० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनावर उपचार घेणाऱ्या १ हजार ४९९ रुग्णांची तब्येत बरी असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ५० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये ७२१ नवे कोरोना रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ७२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ४२ जण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १२ जणांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, ९४४ रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २९ हजार ८३६ वर पोहचली असून यापैकी, २१ हजार २०८ जणांना आत्तापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर महापालिकेच्या रुग्णालयात ५ हजार १४६ सक्रिय रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात ९,१८१ नव्या रुग्णांची नोंद, २९३ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -