घरमहाराष्ट्रPulwama Attack: कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींना लिहिली रक्ताने पत्र

Pulwama Attack: कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींना लिहिली रक्ताने पत्र

Subscribe

पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागूल आणि त्यांच्या ४९ कार्यकर्त्यांनी मोदींना स्वताच्या रक्ताने ही पत्रे लिहिली आहेत.

काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित आबा बागूल आणि त्यांच्या ४९ कार्यकर्त्यांनी मोदींना स्वताच्या रक्ताने ही पत्रे लिहिली आहेत. ‘प्रिय मोदीजी मन की बात के बदले खून की बात चाहीये’, ‘इंडीया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक’, ‘हमे निंदा चाहिये और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए’, ‘जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा’, ‘नोटबंदी नको तर दहशतवाद बंदी करा’, अशा अनेक जळजळीत प्रतिक्रिया असलेली ही पत्र आहेत.


Pulwama Attacke: काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले नरेंद्र मोदींना पत्र

Pulwama Attacke: मोदीजी ‘मन की बात के बदले खून की बात’ चाहीये… पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींना लिहिली स्वतःच्या रक्ताने पत्र #पुलवामा

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, 15 February 2019

- Advertisement -

मोदी सरकारवर टीका

या हल्ल्याला मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप पत्रांद्वारे करण्यात आला असून राजीनाम्याचीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची खुर्ची शहिदांच्या रक्ताने माखली आहे. त्याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत. वारंवार देशाचे सैनिक शहीद होत असताना आपली ५६ इंच छाती कुठे गेली? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी भारतीय लष्कर त्याचा अवश्य बदला घेईलच. आमचा सैन्यदलांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, मोदी आणि भाजपावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मोदींचा राजीनामा हिच सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल असेही या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यातील मृतांचा आकडा ४१ वर जाऊन पोचला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आली असून पाकिस्तानकडून याचा बदला घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येऊ लागल्या आहेत. अनेकांनी केंद्र शासनाला पत्र आणि ईमेल पाठवून आपल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. मात्र, बागूल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेली पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे पत्र कुरीअर आणि ईमेलद्वारे मोदींना पाठविण्यात येणार आहेत. ज्या प्रकारे सर्जीकल स्ट्राईकचे श्रेय मोदी घेतात तसेच या हल्ल्यामुळे आलेले अपयशही स्विकारले पाहिजे – अमित आबा बागूल, पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -