घरCORONA UPDATEकोरोना रूग्णाच्या डब्यात दारू आणि पत्ते, रूग्णाचा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न!

कोरोना रूग्णाच्या डब्यात दारू आणि पत्ते, रूग्णाचा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न!

Subscribe

पुण्यात नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णावर उपचार सुरू होते.

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. पोलिस नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र ड्यूटी करत आहेत. त्यातच तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असच म्हणावं लागेल. पुण्याती नायडू हॉस्पिटलमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने थेट हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णावर उपचार सुरू होते. दररोज अनेक रूग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी जातात. परंतू एका पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. या रुग्णाने थेट पळून जाण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये घातला गोंधळ

रूग्णालयात असणाऱ्या एका पॉझिटिव्ह रुग्णाने घरी जाण्याचा हट्ट धरला. हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर असलेला रुग्ण थेट मुख्य गेटजवळ आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तरीही न ऐकता या व्यक्तीने थेट गेटच्या वर चढून बाहेर पडला. रस्त्याने चालत निघाला, मात्र नंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर रुग्णाला पकडण्यात आले.

हा पळून गेलेला रूग्णाने अल्कोहोल विड्रॉलच्या नैराश्येतून याच पेशंट्सनं खिडकीच्या काचा फोडून तिथल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचही समजत आहे. तर दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटरमध्ये चक्क दारूच्या बाटल्या आणि पत्त्याचा कॅट मागवला होता. यावेळी पोलिसांनी गेटवर केलेल्या चेकींगमुळे हा प्रकार उघडकीस आला. नानापेठेत सापडलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाला मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत होता. पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. पोलिसांनी ज्या तरुणाने हा डबा आणला होता, त्याला चांगलाच काठीने प्रसाद देऊन आल्या पावली परत पाठवून दिले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कोविड सेंटरमध्येच दारू पार्टीचा डाव होता. पण, गेटवर तपासणीमुळे हा डाव पोलिसांनी उधळून लावला.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -