घरमहाराष्ट्रसोन्याची पेस्ट करुन तस्करी करणारी महिला अटकेत

सोन्याची पेस्ट करुन तस्करी करणारी महिला अटकेत

Subscribe

सोन्याची पेस्ट करुन ९० लाखांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ही घटाना समोर आली आहे.

सोन्याची तस्करी करणारे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. मध्यंतरी सोनं तस्करी करणाऱ्या तस्करांने चक्क मोबाईल फोनच्या फ्लिप कव्हर मधून सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस आले होते. सध्या सोन्याच्या तस्करीचा नवा फंडा वापरुन तस्करी करण्यात येत आहे. एका महिलेने सोन्याची पेस्ट तयार करुन ९० लाखांची तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रपकणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. डॅनटसा ज्युनेका जॉन असे या महिलेचे नाव असून पुणे आंतरराष्ट्रीय विमातळावर करण्यात आलेल्या कारवाईत ही घटना समोर आली आहे.

अशी करण्यात आली कारवाई?

पॉलिथिनच्या पिशवीतून सोन्याची पेस्ट करुन घेऊन येत असताना एका महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पकडण्यात आले. या महिलेकडून तब्बल ९० लाख ४४ हजार रुपये किमतीचे २ किलो ७९१ ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. डॅनटसा ज्युनेका जॉन ही महिला दुबईहून स्पाइस जेटच्या विमानाने रविवारी सकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी त्या महिलेची तपासणी केली. तपासणी दरम्यान या महिलेने बेल्टच्या आधाराने कमरेला चार पॉलिथिनच्या पिशव्या बांधल्या असल्याचे आढळून आले. या बांधण्यात आलेल्या पिशव्यांमध्ये सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचे आढळून आले. तिच्या जवळ असलेल्या या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये २ किलो ७९१ ग्रॅम वजनाच्या सोन्याची पेस्ट आढळून आली. या सोन्याची किंमत ९० लाख ४४ हजार २३५ रुपये इतकी होती. या महिलेविरोधात सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

दर महिन्याला होते सोन्याची तस्करी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर महिन्याला एक तरी सोन्याची तस्करी होत असताना दिसत आहे. १७ ऑगस्ट रोजी दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून तीन कोटी रुपयांची सोन्याची तस्करी करण्यात आली होती. या प्रवाशांकडे सोन्याची ८६ बिस्कीटे असल्याचे आढळून आले होते.


वाचा – सोन्याच्या तस्करीचा नवा फंडा, कस्टम अधिकारीही चक्रावले!

- Advertisement -

OMG! See where they hide 3 kg gold!

पाहा ३ किलो सोनं कुठे लपवून आणलं या भामट्यांनी! शोधणाऱ्या पोलिसांना मानलं पाहिजे!

Posted by My Mahanagar on Friday, 26 October 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -