घरमहाराष्ट्रदारु आणून दिली नाही म्हणून सासऱ्याने सुनेला पाजले कीटकनाशक

दारु आणून दिली नाही म्हणून सासऱ्याने सुनेला पाजले कीटकनाशक

Subscribe

अनिता आणि तिच्या सासऱ्या मंडळींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. त्यामुळे सासरची मंडळी अनित यांचा सतत छळ करतात.

आळंदीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु आणून दिली नाही म्हणून सासऱ्याने सूनेला शिविगाळ केला. ऐवढ्यावरच न थांबता सासऱ्याने कुटुंबियांच्या मदतीने जबरदस्ती सुनेला कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेवर सध्या खेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेची प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता संतोष चौधरी या महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी किटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केला. अनिता यांच्या नवऱ्याचे मुंबईमध्ये अपघाती निधन झाले होते. त्यांना एक मुलगा असून ते सासरीच राहतात. अनिता आणि तिच्या सासऱ्या मंडळींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. त्यामुळे सासरची मंडळी अनित यांचा सतत छळ करतात. मंगळवारी हा वाद टोकाला गेला. अनिता यांच्या सासऱ्याने त्यांना दारु आणण्यास सांगितले होते. त्यांनी दारु आणण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या सासऱ्याने पत्नीसह दोन मुलींच्या मदतीने अनित यांना शिविगाळ करत कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या घटनेमध्ये अनिता यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना खेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अनिता यांनी सासरच्या मंडळींविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बाळू चौधरी (सासरे), चंपा चौधरी (सासू), सुरेखा वाघोले (नंदन), रेखा गव्हाणे (नंदन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

हेही वाचा – 

- Advertisement -

कौटुंबिक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -