घरताज्या घडामोडीपुणेकरांची चिंता कायम! रुग्णसंख्येने ओलांडला लाखाचा टप्पा

पुणेकरांची चिंता कायम! रुग्णसंख्येने ओलांडला लाखाचा टप्पा

Subscribe

पुणे शहर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २ हजार ९५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आतापर्यंत १ लाखाचा आकडा ओलांडला आहे.

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २ हजार ९५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येने आतापर्यंत १ लाखांचा आकडा ओलांडला असून या शहरातील चाचण्यांनीही तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. तर शहरात एका दिवसात १ हजार १९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहर आणि जिल्ह्यात १ लाख रुग्णसंख्या

- Advertisement -

शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख २६४ वर पोहोचली आहे. यापैकी ७० हजार ९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यातील ४३ हजार ६०६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे पुण्यात १६ हजार ९७५ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. तर शहरातील गंभीर रुग्णांची संख्या ६७४ असून ४३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर अतिदक्षता विभागात २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २ हजार २७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

एका दिवसात ५९ जणांचा मृत्यू

- Advertisement -

पुणे शहरात मृत्यूच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या २ हजार २९० वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील ३ लाख २ हजार ९४५ चाचण्यांचा समावेश आहे. तर गुरुवारी ५ हजार २०८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

गुरुवारची रुग्णसंख्या

पुणे पालिका नवीन रुग्ण- १४४०
पिंपरी-चिंचवड नवीन रुग्ण- १०१२
पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण- २३३
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण- २७०
गुरुवारी बरे झालेले रुग्ण- ११९६
गुरुवारचे एकूण मृत्यू- ५९
एकूण पॉझिटिव्ह : १,००,२६४
(पुणे शहर : ६२,०३७, पिंपरी-चिंचवड : २६,११८, पुणे ग्रामीण : ७,६४१, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : ४,४६८)


हेही वाचा – नाशिकमध्ये ३१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -