घरमहाराष्ट्रदुष्काळी संकटातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाची धास्ती

दुष्काळी संकटातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाची धास्ती

Subscribe

सध्याच्या वातावरणातील बदलामुळे सह्याद्रीच्या परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यातील शेतकरी अडणीत सापडला आहे. अचानक हवामानातील बदलामुळे भातशेती अडचणीत आल्याने शेतकरी हवादिल झाला आहे.

सध्याच्या वातावरणातील बदलामुळे सह्याद्रीच्या परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यातील शेतकरी अडणीत सापडला आहे. अचानक हवामानातील बदलामुळे भातशेती अडचणीत आल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. भात लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने भाताच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली असताना आता भाताची काढणी सुरु असताना पावसामुळे भाताच्या पिकाच मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे दुष्काळी कचाट्यात सापडलेला शेतकरी आता अवकाळी पावसाच्या संकटात सापडला आहे.

वेळेआधीच पाऊस गायब 

भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ या तालुक्यातील भातशेती पावसाअभावी अडचणीत आली होती. या भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसून वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतल्याने जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली आहे. यामुळे भातउत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून यंदाचे वर्ष कसे जाणार याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणात भाताची लागवड 

या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान आणि पाऊस राहिल्याने भातशेतीला यंदा तोड नव्हती. इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे भातउत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात घेतले गेले. मात्र सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने भाताची लागवड चांगली झाली. ऐन भातशेती जोमात असताना पावसाने काढता पाय घेतला. एकदा गेलेल्या पावसाने पुन्हा तोंड दाखवलेच नाही. पाऊस आज पडेल उद्या पडेल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागेल होते. मात्र, पावसाने सर्वांचीच निराशा केली आणि आता भाताची काढणी सुरु असताना पावसाने सुरुवात केल्याने काढणी केलेला भात काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

खेड तालुका दुष्काळसदृश तालुका यादीमध्ये घेण्यासाठी सध्या महसूल व कृषी विभागामार्फत सत्यमापन परिस्थितीचा सर्व्हे करुन खेड तालुक्याला दुष्काळ यादीत समावेश करुन घ्यावा, अन्यथा पूर्वीपासून कर्जबाजारी होत चाललेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने पुन्हा नव्याने पहाणी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन भीमशक्ती संघटनेच्यावतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.
– विजय डोळस, अध्यक्ष, भीमशक्ती संघटना

- Advertisement -

चासकमानचा उजवा कालवा कोरडाच

चासकमान धरणात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून दुष्काळी परिस्थिती पहाता डाव्या कालव्यात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र उजव्या कालव्यात अद्यापही विसर्ग करण्यात आला नसल्याने खेड तालुक्यातील बहुतांशी उजव्या कालव्यावर अवलंबून असणारी शेती धोक्यात येऊ लागल्याने चांडोली, शिरोली परिसरातील शेतकऱ्यांनी चासकमानच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी संजय सावंत, चिका वाघमारे, संगिता केदारी, रवी सांवत, भाऊ वाडेकर, साहेबराव बेंडाले यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -