Coronavirus चा कहर: पुण्याचा पूर्व भाग सील; आयुक्तांचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गंभीर परिस्थितीची दखल पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी मोठा निर्णय घेत पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याचे आदेश दिले

pune
coronavirus first covid 19 positive patient death in nashik
नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी

जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून सर्वात अधिक आकडा हा महाराष्ट्राचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार;  सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात आणखी ३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील असून एकट्या पुण्यामध्येच कोरोनाचे १०६ रुग्ण आढळून आले होते. यातील पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपरी चिंचवड भागात Coronavirus चा कहर

देशभरासह मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासांत शहरात ४१ रुग्ण वाढले. फक्त पुणे महापालिकेच्या हद्दीतच रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात Coronavirus चा कहर दिवसेंदिवस वाढत असून १९ नवे कोरोना रूग्ण सापडले तर पुण्यात २० नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या गंभीर परिस्थितीची दखल पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी मोठा निर्णय घेत पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.

हे भाग करण्यात येणार सील

पुण्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुण्यातील काही भाग आणि त्याठिकाणची वर्दळ पुर्णपणे बंद असणार आहे. पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत, असे आदेश पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.

पुण्यात कोरोनाचा धोका

पुणे आणि मुंबईत सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यातील सर्वच भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.


VIDEO: कोरोनाविरुद्ध पुणे पोलिसांनीही कसली कंबर; रक्षणकर्त्यांची आर्त हाक नक्की ऐका!