धक्कादायक! पुण्यात इंजिनिअरची हत्या

पुण्यात एका शुल्क कारणांवरुन एका इंजिनिअरची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune
pune : Engineers killed in pune
पुण्यात इंजिनिअरची हत्या

पुण्यात एका इंजिनिअरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंजित प्रसाद असे या तरुणाचे नाव असून हा तरुण पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करायचा अशी माहिती समोर आली आहे. शुल्क कारणावरुन मंजित यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजित प्रसाद हे विमान नगर येथील आयटीपार्कमध्ये संगणक अभियांता म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे के कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते. बसमध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवत त्यांनी बस थांबविण्यास सांगितले. त्या दरम्यान, बस चालका शेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले?, असे गुंडांना विचारत बसच्याखाली उतरले. तेव्हा गुंडानी मंजित यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील काहींनी मंजित यांच्यावर धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले यात मंजित गंभीर जखमी झाले. त्यानंतर सर्व कर्मचारी एकत्र गुंडांच्या दिशेने धावल्याने गुंड पळून गेले. त्यानंतर मंजित यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारा दरम्यान काही तासांनी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांना तीन जणांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here