पुणे फेस्टिवलचे निमंत्रक कृष्णकांत कुदळे यांचे निधन

अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे दिर्घ आजाराने निधन झाले आहे.

Maharashtra
krushnkant-kudale
कृष्णकांत कुदळे यांचे निधन

पुणे फेस्टिवलचे निमंत्रक कृष्णकांत कुदळे (७४) यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले आहे. कृष्णकांत कुदळे हे कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून जोशी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज, (रविवारी) त्यांनी अकोले तालुक्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

कृष्णकांत कुदळे यांच्याविषयी थोडक्यात

कृष्णकांत कुदळे यांनी अनेक संस्थांमध्ये विविध पदं भूषवली आहेत. अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अध्यक्ष, सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी चेअरमन तसेच महात्मा फुले समता परिषदेचे ते कार्यध्यक्ष होते. अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत होते. आज दुपारी ३ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.