घरमहाराष्ट्रपुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह

पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह

Subscribe

दरम्यान या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

मूळ बीडची असलेल्या ३० वर्षीय तरुणीचा पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात ही घटना घडली. तरुणीच्या गळ्यावर खुणा सापडल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तेजसा श्यामराव पायाळ असं त्या तरुणीचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

कुटुंबियांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील पंचशील नगर, पालवन रोड येथील असून तिचं एम.बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण झालं होतं. हिंजवडीमध्ये एका कंपनीत ती नोकरी करत होती. मागील दोन वर्षांपासून ती माणिकबाग परिसरात वनबीएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. तिच्यासोबत दोन बहिणी आणि तिची आई राहत होती. एका कार्यक्रमानिमित्त सर्वजण बीडला गेले होते. पण तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. शवविच्छेदना नंतर याबाबत गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -