पत्नी फेसबुकवरील मित्राशी बोलत असल्याचे समजताच, पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

Pune man, friend brutally murder his wife's social media buddy; arrested
पत्नी फेसबुकवरील मित्राशी बोलत असल्याचे समजताच, पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

पुण्यात रविवारी एका पतीने आपल्या मित्रांसोबत पत्नीच्या सोशल मीडियावरील मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील औंध रुग्णालयाच्या परिसरात ही घटना घडली. पत्नी सोशल मीडियावर दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्यामुळे पतीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले.

सौरभ व्यंकट जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सौरभ औंधमधील संजयनगर येथे राहत होता. तसेच तो एका खासगी ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स डीलरशिप शॉपवर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आरोपी आयाज शेख आणि त्याचा मित्र सोन्या बाराथे यांनी सौरभची हत्या केली. हे प्रकरण कळताच मृतांच्या भावाने पोलिसांकडे जाऊन तक्रार केली असता ही घटना उघडकीस आली.

लग्नापूर्वीपासून शेख याची पत्नी मृत सौरभ जाधव याला ओळखत होती. माहितीनुसार शेखची पत्नी सौरभसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुकच्या माध्यमातून त्याच्याशी गप्पा मारत असत. पण ती कधी व्यक्तिशः त्याला भेटली नव्हती. आरोपी पतीला याबाबत समजताच तो अस्वस्थ झाला. त्यानंतर पती आणि बाराथे या दोघांनी सौरभवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या मानेवर, हातावर आणि उजव्या कानाजवळ वार केला. सौरभच्या मृत्यूची माहिती समजताच भाऊ सुशांत जाधवने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम २०२ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोना पॉझिटिव्ह महिलेला कोरोना नसल्याचं सांगत पाठवलं घरी; दुसऱ्या दिवशी झाला मृत्यू