घरगणपती उत्सव बातम्यापुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन संपन्न

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन संपन्न

Subscribe

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन नटेश्वर आणि पांचाळेश्वर घाटात करण्यात आले. तर महत्त्वाच्या तीन बाप्पांचेही विसर्जन रात्री उशीरा निघून आज सायंकाळी करण्यात आले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील बहुतांश गणपतींचे विसर्जन संपन्न झाले. मात्र पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन आज सकाळी करण्यात आले. काल या बाप्पांची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात निघाली होती. पुण्याच्या परंपरेनुसार मानाच्या पाच गणपतींचे क्रमानुसार विसर्जन करण्यात आले. यामध्ये कसबा गणपती, ताबंडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम , तुळशीबाग मंडळ आणि केशरीवाडा या बाप्पांचे विसर्जन संपन्न झाले. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखील मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांचेही विसर्जन क्रमशः करण्यात आले.

मानाच्या पाच गणपतींचे क्रमाने विसर्जन

वाजतगाजत निघालेल्या पुण्यातील गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मीरोड मार्गे नटेश्वर घाटपर्यंत नेण्यात आली. अनंत चतुर्दशीला मानाचा पहिला कसबा गणपतीची सकाळी १०.३० वाजता निघालेली मिरवणूक सायंकाळी ४.०८ वाजता संपन्न झाली. या बाप्पाचे विसर्जन नटेश्वर घाटात करण्यात आले. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक १०.३५ वाजता सुरु झाली असून सायंकाळी ५.१५ वाजता संपली. याही बाप्पाचे विसर्जन नटेश्वर घाटात करण्यात आले. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक १०.४३ वाजता सुरु होऊन ५.३३ ला संपली. या बाप्पालाही नटेश्वर घाटातच विसर्जीत केले गेले. मानाचा चौथा तुळशीबाग मंडळ्याच्या गणरायाची मिरवणूक दुपारी १२.२५ ला सुरु झाली असून ६.२५ ला मिरवणूक संपन्न झाली. या बाप्पाचे विसर्जन पांचाळेश्वर घाटात करण्यात आले. तर मानाच्या पाचव्या केशरीवाडा गणपतीचा मिरवणूक सोहळा काल दुपारी १.४० ला निघाला असून ही मिरवणूक टिळक रोड मार्गे जाऊन सायंकाळी ७.०५ ला संपन्न झाली. या बाप्पाचे विसर्जन पांचाळेश्वर घाटात करण्यात आले.

- Advertisement -

वाचा : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महापौरांच्या हस्ते आरती

श्रीमंत बाप्पांचे २४ तासानंतर विसर्जन

मानाच्या पाच गणपतींसोबतच पुण्यातील तीन महत्त्वाच्या गणपती बाप्पाचेही विसर्जन थाटामाटात करण्यात आले. तब्बल २४ तास सुरु राहीलेल्या या मिरवणूकीत समस्त पुणेकर सहभागी झाले होते. या महत्त्वाच्या मंडळांमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची विसर्जन मिरवणूक काल सायंकाळी ८ वाजता निघाली असून आज, सोमवारी दुपारी अडीच वाजता संपन्न झाली. लक्ष्मीरोड मार्गे निघालेली ही मिरवणूक नटेश्वर घाट येऊन थांबली. या घाटात रंगारीच्या बाप्पाचे विसर्जन झाले. तसेच अखील मंडई मंडळाच्या गणरायाचीही मिरवणूक रात्री सव्वा दहा वाजता निघाली असून आज दुपारी ४.३० वाजता ही मिरवणूक संपली. तर पांचाळेश्वर घाटात या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या बाप्पाचीही मिरवणूक काल रात्री उशीरा ११ वाजता काढण्यात आली असून सोमवारी ५ वाजताच्या दरम्यान या गणपतीचे विसर्जन पांचाळेश्वर घाटात करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -