अखेर पुण्यात बापट विरोधात जोशी लढत रंगणार

पुण्यातून काँग्रेस पक्षाने माजी आमदार मोहन जोशी यांना रिंगणात उतरविले आहे.

Mumbai
mohan joshi
काँग्रेस पक्षाने माजी आमदार मोहन जोशी

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु होता. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अनेक चर्चा होत होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने माजी आमदार मोहन जोशी यांना पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. सोमवारी रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान, जोशी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने निष्ठावंत गटाला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड इच्छुक होते. तर या दोन नावांबरोबर सुरेखा पुणेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र अखेर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी ९ वी उमेदवार यादी जाहीर करताना पुण्यातून मोहन जोशी तर रावेरमधू डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मोहन जोशींविषयी थोडक्यात

मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून गेल्या ३८ वर्ष ते काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत. पुण्यात काँग्रेसकडून उमेदवार निश्चित होत नसल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. तर पुण्यात काँग्रेसला उमेदवार सापडत नसल्याची टीका देखील विरोधकांकडून सुरु होती. तसेच पुण्यातील उमेदवार ठरण्याआधीच रविवारपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केली होती. दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर हे इच्छुक देखील होते. मात्र, अखेर मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यांच्याविरोधात भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.


वाचा – रावेरमधून काँग्रेसच्या पाटील यांना उमेदवारी; गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वाचा – ‘माझ्या समोर मोदी ५ मिनिटेसुद्धा टिकणार नाहीत’ – ओवेसी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here