पुण्यात नदीकाठचे ५०० कुटुंब सुरक्षित स्थळी हलवले

मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पात्रातील पाणी आता शहरात आणि नदीकाठच्या गावांमध्ये वाहू लागले आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.

Pune
pune more than 500 families are being shifted to safer places
पुण्यात नदीकाठचे ५०० कुटुंब सुरक्षित स्थळी हलवले

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अतीवृष्टीमुळे भीषण अवस्था निर्माण झाली आहे. खडकवासाला आणि वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरल आहेत. मात्र, तरीही या भागात पावसाचा जोर कायम आहे. मुठा नदीचे पाणी आता बाहेर येऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठच्या भागातील कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत ५०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

एनडीआरएफचे जवान  परिसरात दाखल

शहराच्या विविध भागातील नागरिकांची तात्पुरता राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक शहरात दाखल झाले आहेत. परिस्थितीनुसार गरजेच्या ठिकाणी या पथकाला पाठवण्यात येणार आहे.