घरCORONA UPDATEमोठी बातमी; पुण्यात लॉकडाऊन नंतर पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली

मोठी बातमी; पुण्यात लॉकडाऊन नंतर पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली

Subscribe

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात १३ जुलै ते २३ जुलै असा लॉकडाऊन घोषिक केल्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे (Pune Metropolitan Region Development Authority) सीईओ विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांची अवघ्या तीन महिन्यातच बदली करण्यात आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांना पुन्हा एकदा साखर आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. तर सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांना पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या ओएसडीपदी पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त तथा सीईओ विक्रम कुमार हे पुणे महानगरपालिकेचे आयुक्तपदी बदली करण्यात आले आहेत. विक्रम कुमार यांच्या पदावर शेती सचिव सुहास दिवासे यांना पाठविण्यात आले आहे. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि मंचर उपविभागाचे सहायक आुयक्त जितेंद्र दुदी यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -