घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर छापा; दोन अलिशान गाड्या जप्त

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर छापा; दोन अलिशान गाड्या जप्त

Subscribe

पुणे शहरातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. शिवाय, काही कागदपत्रे जमा केली आहेत. या प्रकरणात विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनिल भोसले यांनी जामीनासाठी दोन वेळेस अर्ज केला होता. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -