घाणेरडा प्रकार! मालकाने मजुरासोबत केले असे काही की…

पीडित मजूर हा त्याची आई, वडील, आजोबा आणि आजी या सर्वांसोबत हिंजवडीजवळील जांबे येथे विटभट्टीवर काम करतो. ही विटभट्टी आरोपी संदीप पवार यांच्या मालकीची आहे. 

Pune
Pune_owner did inhuman thing with his labour
प्रातिनिधिक फोटो
पुण्यालगत असलेल्या हिंजवडी परिसरात एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार घडल्याचं उघडकीस आहे. या परिसरात असलेल्या विटभट्टीवर काम करणारा एक कामगार त्याच्या कुटुंबासह जेवण करून बसला होता. मात्र, याच गोष्टीचा राग मनात ठेवून विटभट्टीच्या मालकाने त्या मजुराला बेदम मारहाण केली. मात्र, केवळ यावरच न थांबता मालकाने त्या मजुराला मानवी विष्ठा खायला लावली. या अमानवी कृत्यासाठी २२ वर्षीय पीडित मजुराने आरोपी मालक संदीप पवार यांच्या विरोधात हिंजवडी पोलिसात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मजूर हा त्याची आई, वडील, आजोबा आणि आजी या सर्वांसोबत हिंजवडीजवळील जांबे येथे विटभट्टीवर काम करतो. ही विटभट्टी आरोपी संदीप पवार यांच्या मालकीची आहे.

सविस्तर प्रकरण काय?

 बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडत मजूर आणि त्याचे कुटुंब हे जेवण करून बसले होते. तेव्हा आरोपी पवार याने तिथे येऊन, सर्वांना लगेच आपलं काम सुरु करायला सांगितले. यावर आत्ताच जेवण केलं आहे थोडं बसतो आणि कामाला सुरुवात करतो, असे उत्तर पीडित तरुणाने दिली. मात्र, यामुळे चिडलेल्या मालकाने आईवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा मजुराने देखील शिवीगाळ सुरु केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपी संदीप पवार याने त्याच्या पत्नीला घमेल्यात मानवी विष्ठा आणण्यास सांगितली. विष्ठा घेऊन आल्यानंतर मजुराला बेदम मारहाण करत विष्ठा खाण्यास संदीप पवार याने भाग पाडले. दरम्यान,या संतापजक घटनेप्रकरणी पीडित मजुराने हिंजवडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here