भयंकर! निर्दयी माता-पित्याने अवघ्या १३ दिवसांच्या बाळाला खड्ड्यात पुरले

वडगाव परिसरातील जंगलात एका १३ दिवसांच्या बाळाला आई-वडिलांनी खड्डा खोदून पुरले.

पुण्यासारख्या शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडगाव परिसरातील जंगलात एका १३ दिवसांच्या बाळाला आई-वडिलांनी खड्डा खोदून पुरले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

असा घडला प्रकार

वडगाव येथील सिंहगड कॉलेजच्या पाठिमागे गोदावरी हॉस्टेल असून या परिसरात जंगल आहे. तेथे खड्डा खोदून त्या बाळाला आई-वडिलांनी पुरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना समजताच वडगाव चौकी व सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बाळाच्या आई-वडिलांचा तपास सुरू

हा खड्डा खोदण्यासाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक असते. यामुळे पोलीस तहसीलदारांकडे गेले. तहसील कार्यालयातील अधिकारी आल्यानंतर खोदकाम सुरू करण्यात येणार आहे. हे बाळ अपंग असल्यामुळे त्याला पुरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, दरम्यान या भयंकर घटनेनंतर या बाळाच्या आई-वडिलांचा तपास सुरू आहे.


वाह रे माणुसकी! कपलनं लग्नानंतर ५०० कुत्र्यांना जेवू घातलं