घरमहाराष्ट्रडीएसकेंच्या मेव्हणीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

डीएसकेंच्या मेव्हणीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

डीएसके अर्थात डी. एस. कुलकर्णींच्या मेव्हणीला पुणे सत्र न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक फसवणुक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमांगी कुलकर्णी सध्या तरूंगात आहेत. गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात डीएसकेंच्या मेव्हणी अनुराधा पुरंदरे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना निगडी येथून अटक केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर अनुराधा पुरंदरे गायब झाल्या होत्या. पण, निगडीतल्या एका कुटुंबाकडे अनुराधा पुरंदरे राहत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांना रविवारी अटक करण्यात आली. दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाने अनुराधा पुरंदरे यांना ८ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

आत्तापर्यंत ७ जणांना अटक

- Advertisement -

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी डी. एस. कुलकर्णी, पत्नी हेमांगी कुलकर्णी, पुतणी सई वांजपे, सईचा पती केदार वांजपे, डीएसकेंच्या कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर आणि फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडीला अटक करण्यात आली आहे. तर, ५ जुनला मुलगा शिरीष कुलकर्णीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

बिल्डर डी. एस. कुलकर्णी सध्या येरवडा तुरूंगात आहेत. त्यांच्याविरोधात ३६ हजार ८७५ पानांचे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. ‘ड्रीम सिटी’ या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यानंतर डी. एस. कुलकर्णींचा आर्थिक डोलारा कोसळला. शिवाय गुंतवणुकरांचे पैसे वेळेवर देणे देखील त्यांना अशक्य झाले. दरम्यान या ड्रीम प्रोजेक्टमधून डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना करोडोंचा फायदा पोहोचवल्याचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -