घरमहाराष्ट्रपुण्यात घरफोड्या करणारा तरुण गजाआड

पुण्यात घरफोड्या करणारा तरुण गजाआड

Subscribe

झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोन च्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आत्तापर्यंत ५० घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. तर कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग निवडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने केल्या ५० घरफोड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुनील तलवारे (२८) हा वडगाव मावळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा दोन च्या कर्मचाऱ्यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार; गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली आहे. सुनील याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सुनीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड, सांगवी आणि वडगाव मावळ येथे घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी सुनीलला जुळा भाऊ असून तो देखील घरफोड्या करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुनील हा सराईत गुन्हेगार असून त्याला कमी वेळेत जास्त पैसे कमवून श्रीमंत व्हायचे होते, यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून घरफोड्या करत आहे. त्याने आत्तापर्यंत तब्बल ५० घरफोड्या केल्या आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisement -

वाचा – अंबरनाथ येथील महिलेच्या धाडसामुळे चोर गजाआड

वाचा – साखरपुडा करुन लग्न मोडणारे ‘लखोबा’ कुटुंब गजाआड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -